Wednesday, April 16, 2014

याला जीवन ऐसे नाव

याला जीवन ऐसे नाव

Aathvani... आठवणी...

Aathvani... आठवणी...
आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर वाया गेलेला भूतकाळ आठवतो म्हणून त्रास होतो आणि त्या सुखाच्या असतील तर ते क्षण निसटले म्हणून त्रास होतो.....व.पु.काळे

Tuesday, April 15, 2014

Maitri Tujhi Ani Majhi... मैत्री तुझी आणि माझी...

Maitri Tujhi Ani Majhi... मैत्री तुझी आणि माझी...

हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा

हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा

तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्‌

भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघु
गरुड उभारी पंखे गगनीं
गरुडाहुन बलवान्‌

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्‍तीनें ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्‌

सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरुं गेला भास्वान्‌

बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरितां
वज्र धरी मघवान्‌

देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें
कोप अनावर येइ वायुतें
थांबे तो गतिमान्‌

पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान्‌

शस्त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
ज्याच्या तेजें दिपला दिनमणी
चिरतर आयुष्मान् ‌

करि हनुमन्ता, निष्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा
उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण

Monday, April 14, 2014

Aanand... आनंद ...

Aanand... आनंद ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्या .

भारतीय राज्य घटनेचेनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्या ..

Sunday, April 13, 2014

तुझ्या गालावरची खळी

तुझ्या गालावरची खळी..

चॉकलेटच्या कागदानी काढली हळूच खोडी,
आठवली आपल्यातली चोरटी देणीघेणी,
प्रत्येक वेळी हसताना तू हळूच मान वळवायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

ओठ बोलण्याआधी तुझे डोळेच सगळ बोलायचे,
पापण्यांच्या आडून मला हलकेच चिडवायचे,
मिटल्या डोळ्यांपुढेही तुझीच रूपे फेर धरायची
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

ठरवायचो स्वत:शी, नाहीच तिथे बघायचं..
माझ्या निर्धारच बळ दहा मिनिटही नाही टिकायचं,
किती नाही म्हंटल  तरी आपसूक नजर वळायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...

माझ्या स्वप्नातली तू आजही तशीच आहेस...
शेवटच चॉकलेट मनात आजही जपल आहे,
माहित आहे मला आता नाही वाट पाहायची,
कारण ती खळी आता पुन्हा नाही दिसायची,
जी मला रोज रोज तुझ्या प्रेमात पाडायची....
तुझ्या गालावरची खळी.... 

मोनीष शेखर चौबळ

सुप्रभात

सुप्रभात आजचा रविवार तुमचा अत्यंत आनंदमयी जावो